शैल / $hail
कविता
A collection of quiet reflections and poetic observations on modern existence, time, and the architecture of thought.
काल संध्याकाळी ऑफिस मधून भरधाव वेगात परतत होतो,
सहजच लक्ष समोरच्या Rear View Mirror मध्ये गेले.
सर्व दिवसाच्या आठवणींचा धुरळा उडवत "त्याचा" सप्त अश्वांचा रथ
निशे कडे निघाला होता.
रोजच्या वेगात Rear View Mirror मध्ये बघणे काही होत नाही,
आणि असे सुंदर दृश्य बघता काही येत नाही.
पण आज एवढ्या वेगात ते सुंदर दृश्य नेत्रात आणि मनात टिपत होतो,
त्या समोरच्या आरश्यात.
घरी आलो , तुमचे हे सगळे messages वाचले आणि
आयुष्याच्या वेगवान गाडीत मनाच्या Rear View Mirror मध्ये
आठवणींच्या अश्वांनी चौखूर धुरळा उडवला
शैल / $hail
कविता
समोरच्या पेनेल वरचे सर्व मीटर बदलले
पण तो काही बदलला नाही
मी वेग आयुष्याचा वाढवला
म्हणून तो काही वेगात पळाला नाही
अन मी मंदावलो
म्हणून तो काही सावकाश झाला नाही
आयुष्याची सर्व चक्र बदलली
पण तो काही बदलला नाही
आतुरतेने तिची वाट पाहत होतो
म्हणून तो काही पुढे सरकला नाही
अन ती निघाली
म्हणून तो काही क्षणभर थांबला नाही
प्रेयेसी ते बायको हा बदल झाला
पण तो काही बदलला नाही
त्या भीषण सुनामी नंतर सर्व जग धपापले
म्हणून तो काही थबकला नाही
अन पार्लमेंट मध्ये आम्ही अख्खं अधिवेशन घालवलं
म्हणून तो काही धावला नाही
हिरोशिमा ते सुनामी नंतरचा जपान बदलला
पण तो काही बदलला नाही

