जेव्हा सूर्यालाही उगवावं लागते...
घनदाट किर्र अरण्यात,
विशाल विक्राळ प्राण्यात,
हिंस्र काळ्याभोर जंगलात,
सह्याद्रीच्या कडेकपारीत...
भयभीत महाराष्ट्र झोपला होता जेव्हा,
यवन घोड्यांच्या टापात,
मुघलांच्या पाशवी अत्याचारात,
आदिलशाहीच्या जुलमी राज्यात,
बेबंदशाहीच्या नरकात,
भेदरलेला महाराष्ट्र झोपला होता जेव्हा,
देवदेवस्थानांच्या गाभाऱ्यात,
हिंदूंच्या पवित्र मंदिरात,
गायी-गुरांच्या गोठ्यात,
व वतनदारांच्या कोठ्यात,
अपमानित महाराष्ट्र झोपला होता जेव्हा,
सूर्यालाही उगवावे लागले तेव्हा...



